शिबु सोरेन परत निडणुकीच्या रिंगणात

January 10, 2009 8:21 AM0 commentsViews: 2

10 जानेवारी, झारखंडविधानसभेची निवडणूक हरल्यानंतरही शिबू सोरेन मुख्यमंत्रिपदाची खुर्ची सोडण्याच्या मनस्थितीत नाहीयेत. झारखंडच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेऊन 5 महिने उलटल्यानंतर , सोरेन तमाड या मतदारसंघातून निवडणूक हरले होते. पण सहा महिन्यांचा अवधी पूर्ण व्हायला अजूनही त्यांच्याकडे एक महिना आहे. त्यांच्या निकटवर्तीय मानल्या जाणा-या भाजपच्या एका बंडखोर आमदाराने आज राजीनामा दिला. या जागेवरून सोरेन विधानसभेची निवडणूक पुन्हा लढणार आहेत, असं सूत्रांकडून समजतंय.

close