वाहतूकदार संपाचा मोठा फटका

January 10, 2009 8:26 AM0 commentsViews: 5

10 जानेवारीवाहतूकदारांचा संप अजुनही सुरुच आहे. या संपाचा सर्वात जास्त फटका पिंपरी चिंचवड परिसरातील लघुउद्योगांना बसतोय.वाहतूकदारांच्या संपामुळे तयार मटेरीयल पाठवता येत नसल्याने लघुउद्योजकांना दिवसाला सुमारे दहा करोड रू़पयांच नुकसान होतय.संपामुळे निगडी येथील ट्रान्सपोर्ट नगरमध्ये दोन हजार ट्रक जागीच उभे आहेत.आधीच आर्थिक मंदीमुळे अडचणीत सापडलेले लघुउद्योग आता आणखीच अडचणीत सापडले आहेत. कंपनीत तयार झालेले जॉब वाहतुकदारांच्या संपामुळे वेळेवर मोठ्या उद्योगांना पाठवता येत नसल्याने लघुउद्योजकांना सध्या करोडोरूपयांचे नुकसान सहन करावं लागतंय.मालवाहतुकदारांचा संप अद्यापही सुरूच आहे. या संपामुळं औद्योगिक उत्पादनावरही परिणाम होतोय. औरंगाबादेतील वाळूज औद्योगिक वसाहतीतील अनेक कंपन्यांना त्याचा फटका बसलाय. संप लवकर मिटला नाही तर बजाजसह सर्वच कंपन्यांना उत्पादन थांबवावं लागणार आहे. मालवाहतुक कंपन्यात रोजंदारीवर काम करणार्‍या हमालांचीही त्यामुळं उपासमार सुरू झालीय. भाजीपाल्याचे भावही वाढले आहेत. दरम्यान वाहतुकदार मात्र आपल्या निर्णयावर ठाम आहेत.केंद्राने दहा रूपये डिझेल दर कमी करावे नाहीतर आम्ही जेल भरो आंदोलन करू, असा इशारा पिंपरी चिंचवड वाहतुकदार संघटनेचे बाबासाहेब धुमाळ बाबासाहेब धुमाळ यांनी दिला आहे.आर्थिक मंदीच्या संकटात सापडलेले लघुउद्योगांना आता वाहतुकदारांच्या संपाच्या नवीन प्रश्नाला सामोर जावं लागत आहे.

close