विदर्भातही पुणे पॅटर्न राबवणार

January 10, 2009 10:10 AM0 commentsViews: 2

10 जानेवारी, नागपूरप्रशांत कोरटकर लोडशेडिंग ला कंटाळलेल्या नागरिकांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकार नागपूर आणि अमरावती इथं पुणे पॅटर्न राबवण्याच्या विचारात आहे . या शहरांना सुरळीत वीजपुरवठा करण्यासाठी सरकार आता वेगवेगळ्या कंपन्यांशी बोलणी करत आहे. कोराडी विजनिर्मिती केंद्र जवळ असतानाही नागपूर शहरात सहा ते सात तासांच लोडशेडिंग होत आहे. राज्याची उपराजधानी असतानाही शहरातील नागरिकांना विजेच्या लपंडावाचा सामना करावा लागतोय. त्यासाठी आता राज्य सरकारन पुणे पॅटर्नचा आधार घेतला आहे. या दोन शहरांना लोडशेडिंगमुक्त करण्यासाठी 100 मेगा वॅट अतिरिक्त विजेची गरज भासणार आहे.सध्या नागपुरात 285 मेगा वॅट विजेची गरज आहे, पण 85 मेगावॅटचं लोडशेडिंग करावं लागतं. हे लोडशेडिंग बंद करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत.राज्यसरकार विजेची जुळवाजुळव करण्याच्या मागे लागलय. यासाठी विदर्भ इंडस्ट्रीज असोशिएशन फ्रेंचायझी राहणार आहे. अनेक कंपन्या आता खाजगी विजनिर्मिती करत आहेत. त्यात इंडोरामा, इंडोवर्थ, लाँइड्स सारख्या कंपन्या वीजपुरवठा करू शक तील. अर्थात लोडशेडिंग बंद करण्यासाठी खासगी कंपन्या कडून मिळणारी वीज महाग असणार आहे. नागरिकांना 6 रूपये 55 पैसे प्रति युनीट चुकवावे लागणारेत. त्यासोबतच 100 युनीट पेक्षा जास्त विज वापरणा-यांना 1 रुपया अधिभार ही द्यावा लागेल. हे सगळं जरी असलं तरी लोडशेडिंग मुळ डबघाईस आलेल्या उद्योगधंद्यांना सरकारच्या या प्रयोगामुळे संजीवनी जरूर मिळेल.

close