महानगरपालिकेच्या शाळात बॉक्सिंग प्रशिक्षण

January 10, 2009 2:49 AM0 commentsViews: 5

10 जानेवारी, मुंबई मुंबई महानगरपालिकेच्या शाळेमध्ये आता लवकरच बॉक्सिंगचं ट्रेनिंग दिलं जाणार आहे. महाराष्ट बॉक्सिंग असोसिएशन त्यासाठी पुढे आलीय. महानगर पालिकेच्या शाळेत शिकणार्‍या मुलांना बॉक्सिंगचं प्रशिक्षण मिळावं यासाठी संस्थेनं पुढाकार घेतलाय. कुर्ला आणि जोगेश्वरीच्या शाळेत या वर्षी बॉक्सिंगच्या ट्रेनिंगला सुरवात होईल. महाराष्ट्र बॉक्सिंग असोसीएशननं प्रभादेवीच्या महानगर पालिका शाळेत एका वर्षाचं बॉक्सिंगचं प्रशिक्षण दिलं होतं. महापालिकेच्या शाळेमधल्या स्पोर्टस् स्टाफच्या मदतीनं ही योजना राबवली जाणार आहे.

close