मुख्यमंत्री दिल्लीत

January 11, 2009 6:03 PM0 commentsViews: 4

11 जानेवारी दिल्लीमुख्यमंत्री अशोक चव्हाण दिल्लीत हाते. दिल्लीमधल्या भेटीत मुख्यमंत्र्यांनी ए.के ऍन्टनी, अहमद पटेल आणि शिवराज पाटील यांची भेट घेतली. एका आठवड्यात मुख्यमंत्र्यांची ही दुसरी दिल्ली वारी आहे. राणेसमर्थक कन्हैयालाल गिडवाणी यांनीही अहमद पटेल यांची भेट घेतली. शिवराज पाटील यांच्यासोबत झालेल्या बैठकीत त्यांनी नांदेडला झालेल्या महसूल कार्यालयाच्या वादाबाबत चर्चा केली. सोनिया गांधींनी शिवराज पाटील यांना या वादाबाबत मध्यस्थी करण्याची सूचना केली होती. भेटीबाबत मुख्यमंत्र्यांना विचारलं असता ते म्हणाले, 12आणि 13 तारखेला जिल्ह्यांतील मुख्य कार्यकर्त्याची बैठक असल्यामुळे वरिष्ठ नेत्यांबरोबर बोलणी करण्यासाठी, सल्लामसलत करण्यासाठी ते दिल्लीला आले. आयुक्तालय आणि नारायण राणे यांच्याबाबतचा निर्णय हाय कमांडच घेतील असं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.

close