सत्यमच्या नव्या बोर्डाची घोषणा

January 11, 2009 7:50 AM0 commentsViews: 5

11जानेवारी हैद्राबादसत्यमच्या नव्या बोर्डाची घोषणा करण्यात आली आहे. सरकारकडून तीन संचालकांची नियुक्ती केली गेली आहे. यात एचडीएफसीचे दीपक पारेख, नॅसकॉमचे माजी अध्यक्ष किरण कर्णिक, सी. अच्युतन यांची नेमणूक सरकारतर्फे करण्यात आली आहे. तर इतर सदस्यांची निवडही लवकरच करण्यात येणार असल्याचं पी. सी. गुप्ता यांनी सांगितलं. कंपनीबाबतचे पुढचे महत्त्वाचे निर्णय हे संचालक मंडळ घेईल. हे संचालक मंडळ लगेचच कामकाज सुरू करणार असून येत्या 24 तासांतच नव्या बोर्डाची बैठक होणार आहे. या बैठकीत नव्या अध्यक्षाची निवड करण्यात येईल. दरम्यान सत्यमच्या सर्व कर्मचा-यांची योग्य काळजी घेण्यात येईल असं आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री वाय. एस. आर. रेड्डी यांनी सांगितलं आहे.

close