कात्रजजवळ वाहून गेलेल्या चिमुरडीचा मृतदेह सापडला

June 12, 2013 2:00 PM0 commentsViews: 349

katraj accidentपुणे 12 जून : कात्रजजवळ शिंदेवाडीमधल्या दुर्घटनेमध्ये वाहून गेलेल्या संस्कृती वाडेकरचा मृतदेह अखेर सात दिवसांनी सापडला. दोन दिवसांपुर्वी मुंबई – बंगलोर हायवेजवळ कात्रज बोगद्याच्या पुढे शिंदेवाडी जकात नाक्याजवळ दरड कोसळली होती. माती आणि पाण्याच्या लोंढ्यात आई आणि मुलगी वाहून गेल्या होत्या. या अपघातात विशाखा वाडेकर यांचा मृतदेह रात्री उशिरा सापडला होता तर त्यांची मुलगी संस्कृतीचा मृतदेह मात्र बेपत्ता होता.

 

हे कुटुंब सातार्‍याहून पुण्याला जात होतं. या रस्त्यावरून पाणी वाढत असल्यानं आई आणि मुलगी गाडीच्या बाहेर निघाले. रत्यावरून चालत असताना अचानक मातीचा आणि पाण्याचा लोंढा आला, त्यात दोघी वाहून गेल्या. जेव्हा ही दुर्घटना झाली तेव्हा संस्कृतीचा शोध घेण्यासाठी अग्नीशमन दलाचे जवान आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. मात्र रात्री तीन वाजेच्या सुमारास अग्नीशमन दलाच्या कर्मचार्‍यांनी शोध थांबवला. विशाखा वाडेकर या संस्कृतीच्या आईचा मृतदेहही आम्हीच शोधून काढला. आता संस्कृतीला शोधण्यासाठीही आम्हीच प्रयत्न करतोय . प्रशासन कोणतंही सहकार्य करत नाही अशी तक्रार संस्कृतीचे वडील सचिन वाडेकर यांनी आयबीएन लोकमतशी बोलताना केली होती.

close