वसंतोत्सवात लिटील चॅम्पसची धूम

January 11, 2009 8:41 AM0 commentsViews:

11 जानेवारी पुणेपुण्यात सुरू असलेल्या वसंतोत्सवाचा दुसरा दिवस लिटील चॅम्प्सनी गाजवला. त्यांनी पुणेकर रसिकांची भरभरून दाद मिळवली. नाना पाटेकरसारख्या अभिनेत्याला आपल्या गाण्यावर नाचायला भाग पाडलं. यानंतर उस्ताद शाहीद परवेझ यांच्या सतारवादनं रसिकांना मंत्रमुग्ध केलं. त्यांच्या साथीला होते विजय घाटे. वसंतोत्सवात संध्याकाळी एक वेगळा कार्यक्रम होणार आहे. ग्लोबल वॉर्मिंगवर आधारीत पंचतत्व. हा कार्यक्रम राहुल देशपांडे, राकेश चौरसिया आणि विजय घाटे सादर करणार आहेत. यानंतर शंकर महादेवन आणि रशीद खान यांच्या जुगलबंदीनी वसंतोत्सवाचा समारोप होईल.

close