ना. धों. महानोर यांना जनस्थान पुरस्कार

January 11, 2009 8:01 AM0 commentsViews: 14

11 जानेवारी नाशिकनाशिकच्या कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने दिला जाणारा 10 वा जनस्थान पुरस्कार कवी ना. धों. महानोर यांना जाहीर झाला आहे. 27 फेब्रुवारीला कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनी या पुरस्काराचं वितरण केलं जाणार आहे. एक लाख रूपये आणि मानचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. ज्ञानपीठ पुरस्काराच्या धर्तीवर केवळ मराठी साहित्यिकांसाठी दिला जाणारा जनस्थान हा एकमेव पुरस्कार आहे. आतापर्यंत या पुरस्कारानं मंगेश पाडगावकर, नारायण सुर्वे, श्री. ना. पेंडसे, गंगाधर गाडगीळ, विजय तेंडुलकर, विंदा करंदीकर आदी मान्यवरांना गौरवण्यात आलं आहे.

close