गडचिरोलीत नक्षलवाद्यांनी केली 3 जणांची हत्या

June 13, 2013 1:16 PM0 commentsViews: 6

naxal attack33

गडचिरोली 13 जून : बिहारमध्ये नक्षलवाद्यांनी हल्ला केलाय तर राज्यातसुद्धा नक्षलावद्यांचा धुडगुस सुरुच आहे. गडचिरोली जिल्हयातल्या सूरजगड जंगलात नक्षलवाद्यांनी तीन लोकांची गोळ्या घालून हत्या केलीय. त्यात एका खाण कंपनीचे एमडी मल्लीकार्जुन रेड्डी तर चंद्रपूरमधल्या ‘लॉईड’ या स्टील कंपनीच्या उपाध्यक्षाची गोळ्या घालून हत्या करण्यात आलीय. तर तिसरा स्थानिक आहे. सूरजगडमधल्या लोहखनिज असलेली जमीन ‘लॉईड’ कंपनीला लीजवर मिळालीय. पण, त्याठिकाणी उत्खनन करायला माओवाद्यांचा विरोध आहे. त्यातून ही हत्या झाल्याचा संशय आहे.

close