परवेज मुशर्रफ यांना अटक

June 13, 2013 1:21 PM0 commentsViews: 328

parvejh mushrafलाहोर 13 जून : पाकिस्तानचे माजी अध्यक्ष परवेज मुशर्रफ यांना अटक करण्यात आली आहे. बलुचिस्तानमधले आदिवासी नेते नबाब अकबर बुग्ती यांच्या हत्येच्या आरोपावरून मुशर्रफ यांना अटक करण्यात आलीये. त्यांना दोन आठवड्यांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. मात्र, या काळात त्यांना प्रत्यक्ष तुरुंगात पाठवलं जाणार नाही, ते त्यांच्या फार्महाऊसवरच राहतील अशी अपेक्षा आहे. मुशर्रफ यांनी जामिनासाठी अर्ज केला आहे. 2006 मध्ये अध्यक्ष आणि लष्करप्रमुख असताना मुशर्रफ यांनी अतिरेकीविरोधी मोहिमेचे आदेश दिले होते. त्यामध्ये बुग्ती ठार झाले होते. त्यांच्या हत्येचा आरोप मुशर्रफ यांच्यावर ठेवण्यात आलाय.

close