इशरत जहाँ प्रकरणात गुप्तचर अधिकार्‍याच्या सहभागाचा CBIकडे पुरावा

June 13, 2013 1:23 PM3 commentsViews: 145

ishrat jhanनवी दिल्ली 13 जून : इशरत जहाँ बनावट एनकाऊंटर प्रकरणी सीबीआयने गुप्तचर विभागाचे विशेष संचालक राजिंदर कुमार यांची चौकशी आपण का करतोय याचं स्पष्टीकरण कोर्टात दिलंय. या प्रकरणी कुमार यांचाही सहभाग असल्याचे काही टेलिफोन रेकॉर्ड्स सीबीआयच्या हाती लागलेत. या माहितीनुसार कुमार यांना इशरत आणि इतर तिघांच्या बनावट एन्काऊंटर प्रकरणाची माहिती होती अशी माहिती मिळतेय.

 

सीबीआयची ही चौकशी फक्त बनावट एनकाऊंटर प्रकरणी असेल असंही सूत्रांकडून कळतंय. गुप्तचर विभागाकडून राजिंदर कुमार यांच्या चौकशीचा निषेध केला गेला होता. गुप्तचर विभागाच्या संचालकांनी याप्रकरणी नाराजी व्यक्त करण्यासाठी सीबीआयचे संचालक रणजीत सिन्हा यांची भेटही घेतली होती. तर काँग्रेस एका गुप्तचर विभागाच्या अधिकार्‍याला अडकवण्यात सीबीआयचा वापर करतंय असा आरोप भाजपनं केलाय.

close