यूपीएला सपाच्या धसका, अन्न सुरक्षा विधेयक ढकललं पुढे

June 13, 2013 12:23 PM0 commentsViews: 23

FOOD BILL NEW433नवी दिल्ली 13 जून : अखेर वादात अडकलेलं अन्न सुरक्षा विधेयक पुढे ढकलण्यात आलंय. आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत विधेयकावर कोणताच निर्णय झाला नाही. विधेयक मंजूर करून घेण्यासाठी विशेष अधिवेशन बोलावण्यात येईल असं बैठकीनंतर केंद्रीय अर्थमंत्री पी चिदंबरम यांनी सांगितलं.

 

या विधेयकावर विरोधकांशी चर्चा करण्यात येईल अशी माहिती त्यांनी दिली. अन्न सुरक्षा विधेयकासाठी अध्यादेश आणण्यास राष्ट्रवादी काँग्रेस आणि समाजवादी पक्ष या सहकारी पक्षांसह विरोधकांनी केलेला विरोध हे या निर्णयामागे प्रमुख कारण असल्याचं समजतंय.दरम्यान, विरोधकांनी घाईगडबडीत अध्यादेश आणण्याच्या केंद्र सरकारच्या हालचालींवर टीका केली होती. ही चर्चा संसदेतच व्हायला हवी असा आग्रह विरोधकांनी धरला होता.


अन्न सुरक्षा विधेयकावर अध्यादेश काढण्याचा निर्णय पुढं ढकलण्याची कारणं

– पंतप्रधानांना समाजवादी पक्षाच्या विरोधाची चिंता होती
– हा मुद्दा पुढे करून समाजवादी पक्ष पाठिंबा काढून घेईल अशी चिंता सोनिया गांधी आणि पंतप्रधानांना वाटत होती

close