राही झाली करोडपती !

June 12, 2013 12:28 PM0 commentsViews: 152

 

RAHI_ONE_CRORE3मुंबई 12 जून : कोरियात झालेल्या नेमबाजी वर्ल्ड कप स्पर्धेत गोल्ड मेडल पटकावणार्‍या राही सरनोबतचा आज राज्य सरकारतर्फे एक कोटी रुपयांचं बक्षीस देऊन गौरव करण्यात आला. सह्याद्री शासकीय विश्रामगृहात आज सकाळी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते एक कोटींचा चेक सुपूर्द करण्यात आला. वर्ल्ड कपमध्ये राहीनं 25 मीटर पिस्तुल प्रकारात गोल्ड मेडल पटकावलं होतं. पिस्तुल प्रकारात अशी कामगिरी ती भारताची पहिली नेमबाज ठरली होती.

close