रामलिंगम राजूंना न्यायालयीन कोठडी

January 11, 2009 10:52 AM0 commentsViews: 3

11 जानेवारी हैद्राबादसत्यमचे माजी अध्यक्ष रामलिंगम राजू तसेच त्यांचा भाऊ रामा राजू यांना शुक्रवारी अटक करण्यात आली होती. त्यांना न्यायालयाने 23 जानेवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे.सत्यम घोटाळयामुळे शेअर बाजारावर परिणाम झाला होता. त्यामुळे अनेक गुंतवणूकदारांचं लाखोंच नुकसान झालं आहे.आंध्रप्रदेश पोलिसांसमोर शरणागती पत्करल्यानंतर राजूंची चौकशी करून त्यांना अटक करण्यात आली. त्यांच्याविरुद्ध कलम 406,420,468,477 अंतर्गत गुन्हे दाखल केले आहेत. शुक्रवारच्या 3 तासाच्या चौकशीनंतर शनिवारी चौकशी दरम्यान त्यांना अस्वस्थ वाटू लागल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

close