चंद्रहार महाराष्ट्र केसरी

January 11, 2009 12:53 PM0 commentsViews: 35

11 जानेवारी कडेगाव2009 चा महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील ठरला आहे. चंद्रहार पाटील आणि संदीप बारगुजे यांच्यातल्या महाराष्ट्र केसरीच्या अंतिम स्पर्धेत सांगलीचा चंद्रहार पाटील विजयी झाला.मानाच्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेची अंतिम लढत संध्याकाळी कडेगावला रंगली होती. जवळजवळ दीड लाखापेक्षा जास्त प्रेक्षक कुस्तीची ही अंतिम लढत पाहण्यासाठी हजर होते. अहमदनगरच्या संदीप बारगुजे याने 2005 चा महाराष्ट्र केसरी सईद चाऊसला हरवत स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक दिली होती. त्यामुळे ह्या लढतीला महत्त्व आलं होतं. चंद्रहार पाटील दुस-यादां महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा विजेता ठरला आहे.अहमदनगरच्या संदीप बारगुजेला आस्मान दाखवत चंद्रहार पाटीलनं महाराष्ट्र केसरीचा किताब जिंकला. याबरोबरच त्याने 51 हजार रुपये रोख आणि मानाची समजली जाणारी गदाही पटकावली. लढतीत सुरुवातीपासूनच चंद्रहारने आघाडी घेतली. संपूर्ण सामन्यामध्ये संदीपला त्याने एकदाही संधी दिली नाही. महत्त्वाचं म्हणजे लाखो कुस्तीप्रेमींचा पाठींबाही चंद्रहारला मिळाला. आणि चंद्रहारनेही त्यांची निराशा केली नाही. सुरूवातीपासुन घेतलेली आघाडी टिकवत चंद्रहारनं बाजी मारली.

close