‘नाशिक रन’ने उभारला 50 लाखांचा मदतनिधी

January 11, 2009 1:51 PM0 commentsViews: 5

11 जानेवारी नाशिकनिरंजन टकलेसकाळी 7 वाजता कडाक्याच्या थंडीत नाशिक रनला सुरुवात झाली. नाशिक रनमध्ये हजारो नाशिककर सहभागी झाले होते. या रनमध्ये लहानमुलांपासून ते अगदी ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सगळ्यांनी उत्साहाने भाग घेतला. शंतनू सोमवंशी या अपंग मुलाच्या हस्ते नाशिक रनचं उदघाटन झालं. नाशिकमधल्या अंध, अपंग, आदिवासी अशा उपेक्षित घटकांना मदत करण्यासाठी 'नाशिक रन'चं आयोजन गेल्या 4 वर्षांपासून केलं जातं. त्यातून यावर्षी तब्बल 50 लाखांचा मदतनिधी उभारला गेला आहे.

close