भारिप महासंघाची महाराष्ट्रभर आंदोलनं

January 11, 2009 6:56 AM0 commentsViews: 6

11 जानेवारी अहमदनगरमहाराष्ट्र शासनानं 2009 मध्ये कुठल्या राष्ट्रपुरुषांची पुण्यतिथी, जयंती किंवा स्मृतिदिन साजरे करावेत याचं एक परिपत्रक काढलं. पण यामध्ये भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनाचा उल्लेख केला नाही. याविरोधात भारिप बहुजन महासंघाने महाराष्ट्रभर आंदोलनं केली. अहमदनगरमध्ये याच परिपत्रकाची होळी करण्यात आली. तसंच परिपत्रक काढणा-या अधिका-यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. महाराष्ट्र सरकार गेली 60 वर्ष शाहू, फुले, आंबेडकर आणि गांधीजींच्या नावावर राजकारण करत आहे असा आरोप भारिपनं केला आहे.

close