मिठी नदीच्या पुनरुज्जीवनासाठी यात्रा

January 11, 2009 3:30 PM0 commentsViews: 14

11 जानेवारी मुंबईशिल्पा गाड महाराष्ट्र जल बिरादरीतर्फे मिठी नदी यात्रा काढण्यात आली. या यात्रेत मॅगसेसे पुरस्कार विजेते राजेंद्र सिंह यांनी भाग घेतला होता.मिठी नदीचं नाव काढलं की आजही सामान्य मुंबईकराच्या मनात 26 जुलैच्या भीतीदायक आठवणी जाग्या होतात. या मिठी नदीच्या पुनरुज्जीवनासाठी आतापर्यंत सरकारी पातळीबरोबरच अनेक सामाजिक संस्था प्रयत्न करत आहेत. त्यापैकीच एक महाराष्ट्र जलबिरादरी.मिठीप्रमाणेच मुंबईत ओशिवरा, वाकोला , दहिसर आणि पोयसर अशा एकूण पाच नद्या होत्या . नद्या खरतर पाण्याचे स्रोत पण मुंबईत मात्र अतिक्रमणांचा विळखा आणि नद्यांचे बदललेले मार्ग यामुळे या नद्यांच रूपांतर झालं ते नाल्यात. ज्यानं पुराच्या पाण्यात घेतले शेकडोंचे बळी.राजेंद्रसिंह सांगतात, मिठी नदीच्या आजूबाजूचं अतिक्रमण तोडलं गेलं पाहिजे. आणि नदीच्या परिसर स्वच्छ केला गेला तर मिठी नदीला पूर येणार नाही. राजेंद्रसिंग यांच्या मताची दखल घेतली तर राजस्थानप्रमाणेच मुंबईतही मिठीची मगरमिठी सुटेल आणि तिथे नंदनवन होईल.अन्यथा नदीचा नाला झाला आहेच. त्याचं डबकं व्हायला वेळ लागणार नाही.

close