औरंगाबाद पालिकेत गैरव्यवहारांमुळे तिजोरीत खडखडाट !

June 12, 2013 12:10 PM1 commentViews: 37

aurangabad palikaसिद्धार्थ गोदाम,औरंगाबाद


औरंगाबाद 12 जून :
औरंगाबाद महापालिका सध्या गैरव्यवहारांमुळे चर्चेत आहे. महापालिकेच्या एकंदरीत आर्थिक व्यवहारांवर कॅगनी ताशेरे ओढत अनेक प्रश्न उपस्थित केलेत. महापालिकेनं अदा केलेले सहाशे धनादेश खात्यात पैसे नसल्याने परत आल्याची नामुष्की महापालिकेवर ओढवलीय. राज्य सरकार आता औरंगाबाद महापालिकेवर बरखास्तीच्या कारवाईच्या तयारीत आहे.
औरंगाबाद महापालिकेत आर्थिक गैरव्यवहारांमुळे महापालिकेच्या तिजोरीत कायम खडखडाट दिसतोय. पैसा नसल्याने अनेक विकासकामांना कात्री लावण्याचा सपाटा चालू आहे. ऑक्टोबर 2012 ते मार्च 2013 च्या ऑडिटमध्ये गंभीर स्वरूपाच्या चुका आढळून आल्या आहेत.

महापालिकेतला गैरव्यवहार

– 30 सप्टेबर 2010 ते 18 जानेवारी 2011 महापालिकेचं खाते ‘मायनस’मध्ये
– 13 व्या वित्त आयोगातील साडेसात कोटीचा निधी 2011 मध्ये कर्मचार्‍यांच्या पगारासाठी वापरला
– पुरेसा पैसा खात्यात नसल्यानं सहाशे धनादेश परत आल्याची नामुष्की
महापालिकेच्या गैरकारभाराचा हिशोब राज्य सरकारकडे गेलाय.आता मुख्यमंत्री या बाबी तपासून कायदेशीर कारवाई करण्याच्या पवित्र्यात आहेत. महापालिकेवर सेना-भाजपची सत्ता आहे. सेनेचे खासदार चंद्रकांत खैरे वाढत्या हस्तक्षेपामुळे महापालिकेवर नामुष्की ओढवल्याचा आरोप विरोधक करतात.

 

देयकांची रक्कम अदा करण्यासाठी दिलेल चेक परत आल्याने त्याचा परिणाम महापालिकेची पत घसरण्यात आलाय. अशा सगळ्या आर्थिक गैरव्यवहारामुळे महापालिका बरखास्तीची नामुष्की महापालिकेवर ओढवू शकते.

  • tru citizen of aurangabad

    This is not a new thing for aurangabad, this is happening since last 13 years and this is because of Mr. Chandrakant Kaire and Mr. Jaiswal. Now aurangabad is 50 years back in development as compare to NASIK. …well done sena/bjp…jai maharashtra

close