नातेवाईकांकडून शारदा शर्मा यांचा खून

January 11, 2009 6:52 AM0 commentsViews: 3

11 जानेवारी ठाणे मनोज देवकर 7 डिसेंबरला ठाण्याच्या हिरानंदानी इस्टेटमध्ये शारदा शर्मा यांचा खून झाला. ठाणे पोलिसांनी आता खुन्याला अटक केली. हा खून शर्मा यांच्याचं नातेवाईकांनी पैशासाठी केल्याचं उघड झालं आहे. ठाण्याच्या घोडबंदर भागातली हिरानंदानी इस्टेटमध्ये ओळखीशिवाय कुणालाही प्रवेश नसतो. त्यामुळे पोलिसांचा संशय शर्मा यांच्या नातेवाईंकावरच बळावला. कमल शर्मा मिरारोडला राहतो. त्याच्यावर एक लाखाचं कर्ज होतं, ते कर्ज फेडण्यासाठी त्यानं डाव साधला. शारदा शर्मा यांचे पती ओमप्रकाश शर्मा घरी नसताना त्यानं हा खून केला आणि पैसे लुटले. या खुनामुळे ज्येष्ठ नागरिक एकटे राहण्याची समस्या पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

close