सोमदेवची घोडदौड थांबली

January 11, 2009 6:28 AM0 commentsViews: 2

11 जानेवारी चेन्नईचेन्नई ओपन टेनिस स्पर्धेत स्वप्नंवत घोडदौड करणा-या भारताच्या सोमदेव देववर्मनला फायनलमधे पराभवाला सामोरं जावं लागलं. क्रोएशियाच्या मरिन सिलिचनं 4-6, 6-7 असे दोन्ही सेट जिंकत सोमदेवची विजयी वाटचाल खंडित केली. पहिला सेट सिलीच ने सहज जिंकला. मात्र दुस-या सेटमधे सोमदेवनं त्याला चांगली लढत देत त्याचा विजय लांबवला. चेन्नई ओपन टेनिस स्पर्धेच्या फायनलमधे पोहचणारा तो पहिला भारतीय ठरला .सेमी फायनलमधे त्याची लढत जर्मनीच्या रेनर शट्लरशी होती. मात्र रेनरने मनगटाच्या दुखापतीमुळे माघार घेतली आणि सोमदेवचा फायनलमधे जाण्याचा मार्ग मोकळा झाला. क्वार्टर फायनलमधे इवो कार्लोविकला हरवत सोमदेवने आधीच इतिहास घडवला होता. या विजयानंतर स्पर्धेची क्वार्टर फायनल गाठणारा लिएंडर पेसनंतरचा तो दुसराच भारतीय ठरला. तर त्या आधी जागतिक क्रमवारीत वरच्या स्थानावर असलेल्या मोयालाही हरवत त्याने आपणच भारतीय टेनिसचा उगवता तारा आहोत याची चुणूक दाखवली होती.

close