झरदारी विरुद्ध गिलानी

January 11, 2009 4:31 PM0 commentsViews: 6

11 जानेवारी इस्लामाबादपाकिस्तानात सत्तेचे रंग वारंवार बदलतात. त्याचा झटका आत्तापर्यंत बहुतेक सत्ताधा-यांना बसलाय. आता हाच झटका पाकिस्ताचे राष्ट्राध्यक्ष झरदारी यांना बसण्याची शक्यता आहे. सध्या झरदारी आणि पंतप्रधान युसुफ रझा गिलानी यांच्यात राजकीय संघर्ष सुरू आहे. 26/11च्या मुंबई हल्ल्याबाबतच्या मुद्यावरून या दोघात मतभेद निर्माण झाले आहेत. या संघर्षात नवाझ शरीफ हे गिलानींच्या मदतीला धावून येण्याची शक्यता आहे. शिवाय एकमेकांचे कट्टर विरोधक म्हणून ओळखले जाणारे नवाज शरीफ आणि परवेझ मुशर्रफ, हेही राष्ट्राध्यक्ष झरदारींना खाली खेचण्यासाठी एकत्र येऊ शकतात, असा जाणकारांचा अंदाज आहे. तसं झालंच तर पाकिस्तानात पुन्हा नवं राजकीय चित्र पाहायला मिळू शकेल.

close