‘ईस्टर्न फ्री वे’चं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

June 13, 2013 5:26 PM1 commentViews: 431

free wayमुंबई 13 जून : बहुचर्चित ईस्टर्न फ्री वेचं मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. हा मार्ग उद्यापासून खुला करण्यात येणार आहे. दक्षिण मुंबईतल्या ऑरेंज गेट ते चेंबूर असा 9 किलोमीटर लांबीचा हा देशातला दुसर्‍या क्रमांकाचा फ्लायओव्हर आहे. यामुळे मुंबईकरांना ट्रॅफिकच्या त्रासातून मोठा दिलासा मिळणार आहे. विशेष म्हणजे हा फ्री वे टोल फ्री आणि सिग्नल फ्री आहे. या रस्त्यामुळे दक्षिण मुंबईतून पूर्व उपनगरे, नवी मुंबई आणि पुण्याकडे जाण्याचा वेळ वाचणार आहे. पण या उद्घाटनाच्या कार्यक्रमातच खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांवर अप्रत्यक्षपणे टीका केली. मीडियानं आवाज उठवल्यानंतरच फ्री वेचं उद्घाटन झालं, असं ते म्हणाले.

  • swapnil joshi

    ajit pawar la akkalach nahi ahe kuthe kai bolayache te…….sharad pawar gelyananter yache kai honar ahe dev jaune…!!!

close