बुलडाण्यात जिजाऊ महोत्सवाला सुरुवातन

January 11, 2009 3:54 PM0 commentsViews: 2

11 जानेवारी सिंदखेडराजा12 जानेवारी, मुंबईजिजाऊ महोत्सवाला आज सकाळी सहा वाजता सुरुवात झाली. यावेळी जिजाऊवंदन करण्यात आलं. तसंच पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या हस्ते जिजाऊंच्या मूर्तीचं पूजन करण्यात आलं. संपूर्ण महाराष्ट्रातून या कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणावर लोक आलेयत. मराठा सेवा संघानं उभारलेल्या जिजाऊ सृष्टी येथे सांस्कृतिक कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे. मुख्य कार्यक्रम दुपारी 3 वाजता शिवधर्म पीठावर आयोजित केलाय. या कार्यक्रमात महिला बचत गटांचे आणि पुस्तकांचे स्टॉल्स मोठ्या प्रमाणात आहेत. कार्यक्रमाला दोन लाखांपेक्षाही जास्त लोक जमतील असा अंदाज मराठा सेवा संघानं वर्तवला आहे.

close