विलासरावांचा गडकरींवर अब्रुनुकसानीचा दावा

January 12, 2009 5:35 AM0 commentsViews: 1

12 जानेवारी, मुंबई नितीन गडकरींविरुद्ध मानहानीचा दावा दाखल करणार असल्याचं विलासराव देशमुख यांनी शब्द गप्पा कार्यक्रमात सांगितलं. सायन – पनवेल महामार्गाच्या कामात गडकरींनी देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. पण आजपर्यंत गडकरींना त्याचे पुरावे देता आले नाहीत. त्यामुळे येत्या दोन ते तीन दिवसात गडकरींविरोधात कोर्टात दावा दाखल करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. मुंबईत शब्द प्रकाशनाच्या वतीने आयोजीत केलेल्या शब्द गप्पा या कार्यक्रमात विलासराव बोलत होते. या कार्यक्रमात त्यांनी वेगवेगळ्या विषयांवर आपली मतंही व्यक्त केली. ते ऐकण्यासाठी व्हिडिओवरी क्लिक करा.

close