रेहमानला गोल्डन ग्लोब पुरस्कार

January 12, 2009 6:00 AM0 commentsViews: 1

12 जानेवारी, अमेरिका अमेरिकेत नुकताच 66वा गोल्डन ग्लोब पुरस्कार सोहळा पार पडला. त्या सोहळ्यात ' स्लमडॉग मिलेनिअर ' या भारतीय सिनेमाला यावर्षीचा बेस्ट स्क्रिन प्ले पुरस्कार मिळाला आहे. याच चित्रपटाच्या संगीतासाठी ए.आर.रहमानला बेस्ट म्युझिक डायरेक्टरचा पुरस्कार मिळालाये. 160 देशातील निवडक सिनेमे टीव्ही मालिकांसाठी हा पुरस्कार देण्यात येतो. केट विन्सेट हिला ' द रिडर ' या सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा तर टॉम विल्किन्सला ' जॉन ऍडम्स ' याला मिनी सिरिजसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळालाये. लुरा डर्नला ' रिकाऊंटला ' या मिनी सिरिजसाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे. तर ' वॉल ई ' या सिनेमाने सर्वोत्कृष्ट ऍनिमेटेड सिनेमाचा पुरस्कार पटकावलाये. तर सॅली हॉकिन्सला ' हॅपी गो लकी ' या सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे.

close