मराठी माणसांना प्राधान्य हवं : शिवसेना

January 12, 2009 6:20 AM0 commentsViews: 2

12 जानेवारी, मुंबईम्हाडाने बांघलेली 80 टक्के घरं मराठी माणसांसाठी द्यावीत , अशी मागणी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सामनातल्या अग्रलेखांतून केली आहे. म्हाडाची 863 घरे ही सरकारच्या संस्थेनं बांधली असल्यानं ती मराठी माणसांनाच मिळायला हवीत,असा आग्रह या अग्रलेखात धरलाय. म्हाडाची लॉटरी मराठी माणसांच्या बाजूने लागत नाही, असा आरोपही केलाय.शिवाय मुख्यमंत्र्यानी रेल्वेत मराठी माणसांना स्थान मिळायला हवे आहे,असे म्हटले होते. त्याचा हवाला देत , आता मराठी लोकांना म्हाडाची घरं प्राधान्यानं देऊन कृतीची जोड द्यावी,असंही म्हटलं आहे, मराठी माणूसकडे घर नसल्यानं मुंबईतून बाहेर फेकला जातोय, त्यावर यामुळे काहीतरी आळा बसेल, असा आशावादही शिवसेना प्रमुखांनी व्यक्त केलाय.तसंच म्हाडा मुंबईत जी 1 लाख घरे बांधणार आहेत, त्यात मराठी टक्का किती याचं उत्तरही मुख्यमंत्र्यानी द्यावं,असं म्हटलं आहे.

close