पॉवर योगा – देवीदत्त सुखटणकर

November 4, 2008 7:31 AM0 commentsViews: 96

स्पर्धात्मक युगात स्वत:कडे आणि स्वत:च्या आरोग्याकडे दुर्लक्ष्य करणं होणं स्वाभाविकच आहे. आरोग्याकडे दुर्लक्ष्य केलं तर त्याचा विपरित परिणाम आपसुकच आपल्या कामावर होतो. असं होऊ नये यासाठी स्वत:चं आरोग्य टिकवणं, स्वत:ला फिट ठेवणं आवश्यक आहे. ते कसं ठेवावं याचं मार्गदर्शन 'सलाम महाराष्ट्र'मध्ये देवीदत्त सुखटणकर यांनी 'पॉवर योगा'च्या माध्यमातून केलं आहे. ते तुम्हाला शेजारच्या व्हिडिओवर पाहता येईल. 'पॉवर योगा' ही संकल्पना पारंपारिक योग पद्धतीपेक्षा संपूर्णत: वेगळी आहे. पारंपारिक योगप्रकारात ध्यानधारणेत श्वासावर लक्ष केंद्रीत केलं जातं तर 'पॉवर योगा'मध्ये शारीरिक हालचाली आणि श्वास यांचा मेळ साधून व्यायाम केले जातात. आजकाल बहुतेकांना 'पॉवर योगा' करायला आवडतं. कारण पारंपारिक योगपद्धती त्यांना बोरिंग वाटते. देवीदत्त सुखटणकर 'आनंद योग' नावाची संस्थाही चालवतात. या संस्थेच्या माध्यमातून ते मोठमोठ्या कंपन्यांना, सेलिब्रिटीजना 'पॉवर योगा' शिकवतात. त्यासंस्थेची माहिती anadayoga.in वर पाहता येईल. देवीदत्त सुखटणकर यांनी 'पॉवर योगा'वर केलेलं मार्गदर्शन वरच्या व्हिडिओवर पाहता येईल.

close