अक्षय बनला किंग

January 12, 2009 6:22 AM0 commentsViews: 2

12 जानेवारी, मुंबई सिनेमा आणि लोकप्रियता या दोन्हींमध्ये अक्षय कुमार हल्ली किंग खानशीही टक्कर घेत असतो. सध्या त्या दोघांमध्ये स्पर्धा आहे ती सर्वात जास्त ऍडव्हान्स टॅक्स कोण भरतं याची. सर्वात जास्त ऍडव्हान्स टॅक्स भरणारा अभिनेता म्हणून गेल्या दोन वर्षांपासून शाहरुख खान सगळ्यांना माहीत होता. पण यावेळेला त्याची हॅट्रीक हुकली आहे, असं म्हणायला हवं. कारण यावर्षी सगळ्यात जास्त ऍडव्हान्स टॅक्स भरणारा अभिनेता आहे अक्षय कुमार. गेल्या वर्षीर् 31 कोटी रुपयांचा ऍडव्हान्स टॅक्स भरून किंग खान पहिल्या नंबरवर होता. तोच यावर्षी 15 कोटी भरून दुसर्‍या नंबरवर आला आहे. कारण आता पहिल्या नंबरवर आहे 19 कोटींचा ऍडव्हान्स टॅक्स भरणारा अक्षय कुमार. आणि जास्त टॅक्स भरण्याचा अर्थ हाच की जास्त काम आणि त्यातून कमवलेला जास्त पैसा. त्यामुळे आता अक्षय इज किंग म्हटलं तर ते खोटं ठरणार नाही.

close