बूट लाँड्रीवाला संदीप गजाकस

November 8, 2008 1:07 PM0 commentsViews: 23

आतापर्यंत कपड्यांची लॉण्ड्री ठाऊक होती. पण संदीप गजाकसमुळे शू लॉण्ड्री ही नवी संकल्पना 'सलाम महाराष्ट्र'मधून समजली. माहागडे शूज घेता येतात पण त्यांची काळजी घेता येत नाही. ती काळजी संदीप गजाकस घेतो त्याच्या शू लॉण्ड्रीच्या माध्यामातून. संदीपनं आठ वर्षं बोर्डिंग स्कूलमध्ये काढली आहेत. त्यानंतरची पाच वर्षं तो एनसीसीत होता. कॉलेजच्या दिवसांमध्ये त्याने फॅशन शोंमधूनही कामं केली आहेत. बोर्डिंग स्कूल, एनसीसी, फॅशन शो या तीन टप्प्यांमुळे संदीपला पादत्राणांचं महत्त्व कळून आलं. लोक त्यांच्या चपला-बुटांच्या काळजीबद्दल गंभीर नसतात याची जाणीव झाली. फायर इंजिनिअर असलेल्या संदीपला आपल्याला करिअरची सुरुवात काहीशा हटके विषयाने करायची होती. म्हणूनच त्याने 'शू लॉण्ड्री' सुरू केली. या 'शू लॉण्ड्री'मधून संदीप शुज धुतो. त्या शूमध्ये काही डॅमेज असल्सास तो दुरुस्त करून देतो. मुंबईतल्या दोनशे ब्रॅण्डेड शुजच्या दुकानांनी त्याचाशी टायअप केलं आहे. 'सलाम महाराष्ट्र'मध्ये त्याने आपल्या शू लॉण्ड्रीच्या प्रवासाविषयी सांगितलं. तेव्हा त्याच्या बोलण्यातून एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली आणि ती अशी की, अ मॅन इज अ‍ॅल्सो क्नोन बाय हिज् शुज!

close