ओळख स्पंदन परिवाराची

November 9, 2008 12:56 PM0 commentsViews: 16

सर्वसामान्यांमध्ये सिनेमाची जाण निर्माण करण्यासाठी कार्यरत असलेले ' स्पंदन ' परिवाराचे संस्थापक अमरजीत दामले आणि परिवाराचे सदस्य देवेंद्र गोलटकर यांना ' सलाम महाराष्ट्र ' मध्येआमंत्रित करण्यात आलं होतं. ' स्पंदन 'च्यावतीनं कुठलंही शुल्क न आकारता फिल्म मेकिंगच्या कार्यशाळा घेतल्या जातात. ' प्रत्येक करियरमध्ये गॉडफादर लागतो. या क्षेत्रात हमखास लागतो. तेव्हा या क्षेत्रात येणार्‍या मुलांसाठी आम्ही ' गुडफादर ' बनतो. तो कार्यशाळेतून बाहेर पडल्यावर चित्रपट क्षेत्रात असेल की नाही, ही पुढची गोष्ट. पण चित्रपट कसा बनतो, हे त्याला कळतं. सिनेमा मेकिंग ही प्रेगन्सी सारखीच आहे. एक वेगळा दृष्टीकोन विद्यार्थ्याला मिळतो. एक ऑडियन्स घडला जातो', असं अमरजीत दामले यांनी सांगितलं.2000 मध्ये स्पंदन परिवाराची चळवळ सुरू झाली. अमरजीत दामले हे अभिनय क्षेत्रात होते. पण त्यापेक्षाही सिनेमा क्षेत्रात बरच काही करण्यासारखं आहे, हे त्यांना जाणवलं. त्यांच्या परिवाराचे सदस्य असलेले देवेंद्र गोलटकर यांनी सुरुवातीच्या अनुभवाबद्दल सांगितलं. ' माझ्या पहिल्या प्रोजेक्टचं नाव चिरकूट होतं. बजेट छोटं होतं. 40 मिनिटाचं शूट एका तासात होईल, असं वाटलं होतं. पण ते झालं नाही. पनवेलला शुटिंग होतं. सुरूवातीला ते रेकॉर्ड होत नव्हतं. कॅमेरा हाताळताना हात थरथरत होता ', असं गोलटकर म्हणाले. हा अनुभव त्यांना नंतर बरंच काही शिकवून गेला. ' कोडॅक ' तर्फे घेण्यात आलेल्या चार खंडात घेण्यात आलेल्या स्पर्धेत त्यांना बेस्ट सिनेमोटोग्रॉफरचा पुरस्कार मिळाला आहे.अनेक विद्यार्थ्यांनी ' स्पंदन 'मधून बाहेर पडल्यानंतर यश मिळवलं. ' स्पंदन' च्या वाटचालीत आलेले अनेक अनुभव अमरजीत दामले आणि देवेंद्र गोलटकर यांनी सांगितले.

close