म्हाडाच्या घरांसाठी रांगच रांग

January 12, 2009 4:30 AM0 commentsViews: 1

12 जानेवारी, मुंबई म्हाडाच्या सर्वसामान्यांना परवडणार्‍या घरांच्या योजनेच्या फॉर्मसाठी मुंबईकरांच्या उड्या पडल्या आहेत. सकाळी पाच पासून लोकांनी एचडीएफसी बँकेपुढं पुढे लोकांनी रांगा लावल्या आहेत. एचडीएफसीची बँकेच्या बाहेर 1 किलोमीटरची म्हाडाच्या घरांच्या फॉर्मसाठी लांबलचक रांग लागली आहे. मुंबईमध्ये आपलं हक्काचं घर व्हावं या स्वप्नापोटी लोकांनी रात्री 3 वाजल्यापासून रांगा लावल्या होत्या. फक्त 3863 घरं या ठिकाणी आहेत. खरं तर हे म्हाडाच्या घरांचे फॉर्म 30 जानेवरीपर्यंत मिळणार आहेत. पण यंदा म्हाडाची घरं कमी उत्पन्न गट, मध्यम उत्पन्न गट आणि उच्च मध्यम उत्पन्न गट या तीन स्थरांत मिळणार आहेत. त्यामुळे आपल्या फॉर्म मिळतील की नाही या शंकेपोटी लोकांनी म्हाडाच्या घरांसाठीच्या फॉर्मसाठी एकच गर्दी केली आहे. तसंच विक्रोळीत निघणारे फॉर्म हे फक्त विक्रोळीतल्या रहिवाशांसाठी आहेत की बाहेरच्या रहिवाशांसाठीही, अशा अनेक शंका म्हाडाचे फॉर्म घेण्यासाठी लोकांच्या मनात आहेत. म्हाडानं फॉर्म वेबसाईटवरही उपलब्ध करावेत असंही काही लोकांचं म्हणणं आहे.

close