वाचाल तर ‘वाचाल’ (भाग – 2)

November 17, 2008 10:54 AM0 commentsViews: 60

सलाम महाराष्ट्रच्या दुस-या भागात लेखक सुबोध जावडेकर स्वत:च्या वाचनाच्या पॅशनविषयी बालेले. शालेय जीवनात त्यांना सर्वात भावलेलं पुस्तक म्हणजे 'युगांत'. लेखिका इरावती कर्वे यांचं ते पुस्तक आहे. त्या पुस्तकाविषयी जावडेकर सांगतात – "मला युगांत पुस्तक भरपूर आवडलं होतं. इतंकं की ते माझ्याजवळ मला हवंहवंसं वाटत होतं. त्याकाळी आजच्यासारखी झेरॉक्सची साधनं उपलब्ध नव्हती. आणि ते पुस्तक विकत घेण्याची माझी ऐपत नव्हत. त्यामुळे त्या पुस्तकाचे मला आवडलेले भाग मी अक्षरश: लिहून ठेवले होते."

close