विप्रोवरही वर्ल्ड बँकेचे निर्बंध

January 12, 2009 8:37 AM0 commentsViews: 1

12 जानेवारीसत्यम घोटाळ्यानंतर देशातली तिसर्‍या क्रमांकाची सॉफ्टवेअर कंपनी विप्रोही आता चर्चेत आलीय. जागतिक बँकेनं गेल्यावर्षापासून विप्रोला बँकेच्या करारांसाठी बोली लावण्यावर निर्बंध आणल्याचं कंपनीनं आता उघड केलं आहे. ही बंदी 2011 सालापर्यंत असणार आहे. जागतिक बँकेच्या अधिकार्‍यांना विप्रोनं त्यांचं काम पूर्ण करुन घेण्यासाठी काही शेअर्स ऑफर केल्याचं जागतिक बँकेनं म्हटलंय. पण या अधिकार्‍यांनी विप्रोच्या अमेरिकेतील शेअर्ससाठी रजिस्ट्रेशन केलं असल्याची माहिती विप्रोनं आमच्या सूत्रांना दिलीय आणि म्हणूनच या अधिकार्‍यांच्या वैयक्तिक हेतूपायी कंपनीवर ही बंदी घातलीय असं विप्रोचं म्हणणं आहे. जागतिक बँकेच्या या बंदीमुळं विप्रोच्या बिझनेसवर फारसा परिणाम होणार नाही असं विप्रोनं म्हटलंय. दरम्यान सत्यम आणि विप्रोनंतर जागतिक बँकेनं सॉफ्टवेअर क्षेत्रातली एक कंपनी मेगासॉफ्टवरही अशा प्रकारे बंदी घातल्याची महिती मिळाली आहे.

close