राष्ट्रीय औद्योगिक उत्पादनात वाढ

January 12, 2009 9:19 AM0 commentsViews: 4

12 जानेवारीदेशाच्या औद्योगिक उत्पादनात सुधारणा झाली आहे. आज जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार नोव्हेंबर महिन्यात औद्योगिक उत्पादन 2.4 टक्क्यांपर्यंत वाढलं आहे. ऑक्टोबर महिन्यात हीच आकडेवारी निगेटिव्ह लेव्हलपर्यंत गेली होती. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात औद्योगिक उत्पादनाचा दर पाच टक्के होता. निर्माणक्षेत्राचा विकासही यावेळी 2.4 टक्के झाला आहे . पण कॅपिटल गुड्स आणि कन्झ्युमर ड्युरेबल गुड्स क्षेत्राची गती मंदावलेली दिसत आहे.

close