वाहतूकदारांचा संप मागे

January 12, 2009 12:38 PM0 commentsViews: 7

12 जानेवारीगेले 8 दिवस चालू असलेला मालवाहतूकदारांचा देशव्यापी संप मागे घेण्यात आला आहे. ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसचे प्रतिनिधी आणि सरकारमध्ये झालेल्या चर्चेनंतर हा संप मागे घेण्याचा निर्णय झाल्याचं, ट्रान्सपोर्ट काँग्रेसचे ब्रम्ह दत्त यांनी सांगितलं. सरकार आणि ट्रान्सपोर्ट काँग्रेसमध्ये कोणकोणत्या मुद्यावर चर्चा होऊन तोडगा काढण्यात आला, त्यावर मात्र दत्त यांनी काहीही बोलण्यास नकार दिला. याआधी मुख्यमंत्री आणि परिवहन मंत्री यांच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन वाहतूक महासंघाचे अध्यक्ष प्रकाश गवळी यांनी वाहतूक आयुक्त आणि परिवहन सचिव यांच्या उपस्थितीत आपला संप मागे घेतला होता.

close