ट्रेकिंगला जोड कॉर्पोरेट ट्रेनिंगची

December 7, 2008 11:01 AM0 commentsViews: 11

शनिवार, रविवार म्हटला की आपल्यापैकी कित्येकांना भटकायला आवडतं. सलाम महाराष्ट्र 'मध्ये अशी व्यक्ती आली होती की जिने भटकंतीला कॉर्पोरेट ट्रेनिंगची जोड देऊन त्यर लोकांना स्ट्रेसलेस जीवन जगायला शिकवलं आहे. त्या व्यक्तीचं नाव आहे गौरांग स्वर्गे. गौरांग स्वर्गे हा फक्त कॉर्पोरेट ट्रेनिंग देत नाही, तर तो आऊट बाऊण्ड कॉर्पोरेट घेतो. तो कॉर्पोरेट सेक्टरमधल्या लोकांना बाहेर घेऊन जातो. त्यातून तो लोकांना साहसी खेळ शिकवतो. या साहसी खेळांच्या माध्यमातून तो लोकांना टीम वर्क, टीम बिल्डींग, मोटीव्हेशनचं प्रशिक्षण देतो. कॉर्पोरेट सेक्टरमध्ये टीम वर्क, टीम बिल्डींग आणि मोटीव्हेशचं महत्त्व आहे. लोकांना टीम वर्क आणि टीम बिल्डींग महत्त्व कळावं म्हणून गौरांग करत आहे. गौरांग स्वर्गेने ' सलाम महाराष्ट्र 'मध्ये सांगितलेलं कॉर्पोरेट ट्रेनिंगचं महत्त्व व्हिडिओवर पाहता येईल.

close