पंढरपूरच्या आश्रमशाळेत विद्यार्थ्यांचा छळ

January 12, 2009 2:10 PM0 commentsViews: 1

12 जानेवारी, पंढरपूरसुनील उंबरे पंढरपूरच्या संत गाडगेबाबा आश्रमशाळेत विद्यार्थ्यांचा शारीरिक आणि मानसिक छळ केला जात आहे. कोणाला अध्यक्षांच्या पुतण्याच्या घरी काम करायला सांगितलं जातं, तर कोणाला दारू आणायला सांगितली जाते. पंढरपूरच्या सामाजिक कार्यकर्त्यांनी या संस्थेचं खरं पितळ उघड केलं. आयबीएन लोकमतनं तिथल्या विद्यार्थ्यांना बोलतं केलं तेव्हा धक्कादायक बाब उघडकीला आली. आपल्या तक्रारी मांडल्यानंतर यांनी भीती वाटतेय की आश्रमशाळेत आपल्याला आणखी त्रास दिला जाईल. प्रत्येक विद्यार्थ्याच्या तक्रारी वेगवेगळ्या आहेत. बहुतेक विद्यार्थ्यांना जातीवरून त्रास दिला जात आहे. तिथल्या सामाजिक कार्यकर्त्यांनी संस्थेतल्या पदाधिकार्‍यांना याचा जाब विचारला…त्यानंतर पोलिसांकडे ही तक्रार नेली…पण पोलिसांनी वेळकाढूपणाची भूमिका घेतली. संस्थाचालक आल्यानंतरच यावर तोडगा काढला जाईल. असं तहसीलदारांनी सांगितलं… वर संस्थेची बदनामी होईल अशा कोणत्याही बातम्या प्रसिद्ध करू नका अशी विनंती करायलाही ते विसरले नाहीत.

close