गप्पा विभावरी बांधवकरांशी (भाग : 2)

December 12, 2008 8:18 AM0 commentsViews: 5

' सलाम महाराष्ट्र 'मध्ये ठुमरी गायिका विभावरी बांधवकर आल्या होत्या. त्यांनी कार्यक्रमात ठुमरी ऐकवल्या. त्या किराणा घराण्याच्या गायिका आहेत. त्यांनी संगीत अलंकारचं शिक्षण घेतलंय आहे. 1999 साली मानव संसाधन विकासकडून त्यांना ठुमरीसाठी फेलोशिप मिळाली होती. त्यांनी लायब्ररी सायन्समध्येही डिग्री घेतली आहे आणि गेली अनेक वर्षं त्या विक्रोळीच्या सेंट जोसेफ हायस्कुलमध्ये लायब्ररियन म्हणून काम पाहत आहेत. देशाच्या विविध भागात त्यांचे कार्यक्रम झाले आहेत. त्याचबरोबर त्यांनी अकाशवाणीवरही अनेक कार्यक्रम केलेत. 2005 मध्ये त्यांनी मानाच्या सवाई गंधर्व महोत्सवामध्येही गायन केलं आहे. विभावरी बांधवकरांशी मारलेल्या गप्पा व्हिडिओवर पाहता येतील.

close