सेना-भाजपात वाद नाही-मुंडे

January 12, 2009 12:38 PM0 commentsViews: 1

12 जानेवारी लोकसभा निवडणुकीसाठी सेना भाजप युतीमध्ये जागा वाटपाची बोलणी अजून सुरूच झाली नाही, त्यामळे शिवसेनेला निम्म्या जागा हव्यात असा प्रचार केवळ पेपरमधूनच होत आहे. या प्रचारामुळे दोन्ही पक्षांच्या संबंधांवर काहीच परिणाम झाला नसल्याचं स्पष्टीकरण भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस गोपीनाथ मुंडे यांनी दिलं आहे. भाजप लोकसभेची निवडणूक लालकृष्णअडवाणींच्या नेतृत्त्वाखालीच लढेल, असंही मुंडे म्हणाले.सेना-भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांची जागावाटपाबाबत अनौपचारिक बैठक झाली आहे. आता जागा वाटपाबाबत अंतिम घोषणा या आठवड्यात करण्यात येईल असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.

close