म्हाडाची घरं मराठी माणसांनाच-राज ठाकरे

January 12, 2009 3:17 PM0 commentsViews: 72

12 जानेवारी मुंबईमनसेचे अध्यक्ष राज ठाकरे कोल्हापूर महोत्सवात हजर होते. मुंबईतल्या शिवाजीपार्कमध्ये हा महोत्सव चालू आहे. यावेळी म्हाडाची सर्व घरं मराठी माणसांनाच मिळाली पाहिजे अशी मागणी राज ठाकरे यांनी केली. मुंबई इथे चालू असलेल्या महोत्सवातील भाषणाच्यावेळी त्यांनी ही मागणी केली.मुंबईत म्हाडाची 3863 घरं आजपासून विक्रीला काढण्यात आली आहेत. या घरांपैकी 80 टक्के घरं मराठी माणसाला मिळावीत अशी मागणी शिवसेनेनं केली आहे. त्याचीच री ओढून राज ठाकरे म्हणाले की म्हाडाची 100 टक्के घरं मराठी माणसांना मिळाली पाहिजे.

close