गरोदर बाईंनं बाळाला पळवलं – नलिनी

January 12, 2009 8:20 AM0 commentsViews: 51

12 जानेवारी मुंबईसायन हॉस्पिटलमधून 1 जानेवारीला चोरी झालेलं 4 दिवसांचं बाळ अजूनही सापडलेलं नाही. बाळ चोरी होऊन 11 दिवस उलटून गेले. हॉस्पिटलमधल्या 10 नंबर वॉर्डमधून एका गरोदर बाईनं हे मूल चोरल्याचा आरोप बाळाच्या पालकांनी केला आहे. त्या वार्डमधल्या प्रत्यक्षदर्शी नलिनी साळसकर यांनी सांगितलं, सकाळी 7 वाजता हॉस्पिटलच्या वॉर्डमध्ये एक गरोदर बाई फे-या घालत होती. ते बाळं रडत होतं त्यावेळी तिने ते खेळावायला घेतलं. ही बाई नेरुरकरांची नातेवाईक असेल म्हणून ते बाळ तिने घेतलं असावं असं त्यांना वाटलं. ती बाई साधी सरळ दिसतं होती. गो-या रंगाची, 35-40 वयाची होती. तिच्या हातात केस पेपर होते. त्या गरोदर बाईने वार्डमधल्या अजून एका बाईचं मुलं खेळवायला घेतलं होतं पण त्यावेळी तिला हटकवलं होतं. त्यानंतर डॉक्टरांची तपासण्याची गडबड सुरू झाली आणि त्यामध्येच तिने मुलं पळवलं असणार.सायन हॉस्पिटलमध्ये रुग्णांना भेटण्याची वेळ आहे संध्याकाळी 4.30 ते 6.30 वाजेपर्यंत. मग सकाळी 7 वाजता ह्या वार्डमध्ये ही बाई कोण होती आणि कशासाठी आली होती यांचा तपास अजून पोलिसांनाही आणि सायन हॉस्पिटललाही लागलेला नाही.

close