पीटरसन, ईसीबीमधले संबंध ताणले

January 12, 2009 6:31 PM0 commentsViews: 2

12 जानेवारीइंग्लंड क्रिकेट टीममधले वाद मिटवण्यासाठी इंग्लंड क्रिकेट बोर्डाचा सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहे. पण असं असलं तरी केविन पीटरसन आणि ईसीबीमधले संबंध आता अधिकच ताणले गेलेत हे आता उघड झालंय. भारत दौ-यावर असतानाही पीटरसननं राजीनामा देण्याची धमकी दिली होती असा खुलासा इसीबीच्या अधिका-यांनी केलाय. मोहालीमध्ये झालेल्या दुस-या टेस्ट नंतर पीटरसननं राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली होती. पण त्यावेळी एक सुटी घेऊन या निर्णयाचा विचार करावा असा सल्ला इसीबीचे उपाध्यक्ष डेनिस अमिस यांनी दिला होता. पण पीटरसननं इंग्लंड टीमचे कोच पीटर मुर्स आपल्याला नको असल्याचं कळवत या प्रकरणाला आणखी गंभीर रूप देण्यचा प्रयत्न केला.

close