गप्पा माधुरी करमरकर आणि प्रा. श्रीकृष्ण कालगांवरांशी (भाग : 2)

January 5, 2009 4:00 AM0 commentsViews: 84

5 जानेवारी हा संगीतकार सी. रामचंद्र यांचा स्मृतिदीन. त्यानिमित्तानं ' सलाम महाराष्ट्र ' मध्ये गायिका माधुरी करमरकर आणि कोल्हापूरचे संगीत प्रेमी प्रा. श्रीकृष्ण कालगांवकर आले होते. सी. रामचंद्र यांच्या स्मृतिदीना निमित्त गायिका माधुरी करमरकर यांनी सी. रामचंद्रांची जुनी गाणी ऐकवली. सी. रामचंद्र सांगतात, " सी. रामचंद्रांच्या गाण्यांविषयी बोलायचं झालं तर त्यांच्या गाण्यांच्या चाली ह्या अतिशय सोप्प्या असतात. त्यामुळे त्या गाण्यांच्या ओळी ह्या सहजच आपल्या ओठांवर रुळतात. गाण्यांचे शब्दही भरपूर सोपे असतात. गाणी सहजच लक्षात राहतात. " गाण्यांबद्दल सांगताना त्यांनी सी. रामचंद्रांची निरनिराळी गाणीही गाऊन दाखली. माणसाचं व्यक्तिमत्त्व हे त्याच्या कलेतून प्रगट होत असते. सी रामचंद्र यांच्या गाण्याचा अभ्याास केला तर त्यांच्या गाण्यातली विनोद शैली भावते. सी. रामचंद्रांच्या गाण्यांबद्दल कोल्हापूरचे संगीतप्रेमी प्रा. श्रीकृष्ण कालगांवकर सांगतात, " हिंदी गाण्यांमध्ये विनोद निर्मितीसाठी गाणी गायली जायची. या गाण्यात सी. रामचंद्रांची गाणी सर्वात जास्त असायची. त्यांच्या गाण्यात मला खट्याळ आणि खोडकरपणा जाणवायचा. सी. रामचंद्रांच्या गाण्याची बलस्थानं होती. त्यामुळेच त्यांची गाणी अजुनही त्यांच्या ओठांवर रुळतात. " गायिका माधुरी करमरकर आणि कोल्हापूरचे संगीतप्रेमी प्रा. श्रीकृष्ण कालगांवकर यांच्याशी बोलताना जुन्या गाण्यांच्या भावविश्वाची जी सफर झाली आहे ती तुम्हाला शेजारच्या व्हिडिओवर पाहता येईल.

close