गप्पा अनुराधा गोरे आणि प्रदीप ब्राह्मणकर यांच्याशी

January 15, 2009 5:31 AM0 commentsViews: 45

15 जानेवारी हा लष्कर दिन म्हणून साजरा केला जातो. यंदाचा 61वा लष्कर दिन आहे. आजच्या दिवशी 61 वर्षांपूर्वी भारतीय लष्करप्रमुख म्हणून जनरल के एम करिअप्पा यांनी सूत्रं हाती घेतली होती. त्यानिमित्तानंच लष्कर दिन साजरा केला जातो. लष्कराच्या सज्जतेचा आढावाही या दिवशी घेतला जातो. लष्करदिना निमित्त ' सलाम महाराष्ट्र ' मध्ये अनुराधा गोरे आणि प्रदीप ब्राह्मणकर आले होते.अनुराधा गोरे ह्या शहिद विनायक गोरे यांच्या आई आहेत. दहशतवादाच्या विरोधात गेल्या अनेक वर्षांपासून त्या जनजागृती करत आहेत. अनुराधा गोरे यांनी ' सलाम महाराष्ट्र ' मध्ये त्यांच्या निरनिराळ्या उपक्रमांविषयी माहिती दिली. ज्या विद्यार्थ्यांना लष्करात जायचे आहे त्यांना प्रशिक्षण देण्याचं, वेगवेगळ्या परीक्षांची तयारी करुन घेण्याचं काम प्रदीप ब्राह्मणकरांची ' ऍपेक्स ' ही संस्था करते. प्रदीप ब्राह्मणकरांनी ' सलाम महाराष्ट्र ' मध्ये एनडीएची तयारी आणि लष्करातलं करिअर याविषयी मार्गदर्शन केलं.अनुराधा गोरे आणि प्रदीप ब्राह्मणकर यांनी केलेलं मार्गदर्शन व्हिडिओवर ऐकता येईल.

close