मॅथ्यू हेडन निवृत्त

January 13, 2009 8:59 AM0 commentsViews: 4

13 जानेवारी, मुंबईऑस्ट्रेलियाचा बॅटसमन मॅथ्यू हेडन आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून रिटायर झालाय. गेल्या काही दिवसापासून,हेडन फॉर्ममध्ये नव्हता.दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टेस्ट सिरीजमध्ये त्याची कामगिरी अत्यंत निराशाजनक ठरली होती. गेल्या पाच टेस्ट मॅचमध्ये त्यानं फक्त 149 रन्स केले होते. त्यातचं त्याला वन डे टीममधून काढून टाकण्यात आलं होत.त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या या दणकेबाज बॅटसमनंही रिटायरमेन्ट घेतली. हेडननं, वनडे आणि टेस्ट क्रिकेटमध्ये आपला ठसा उमटवलाय. टेस्ट क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर तीस सेंच्युरीज आहेत. त्यानं टेस्ट क्रिकेटमध्ये आठ हजारच्यावर रन्स केलेत. तर वनडेत त्यानं सहा हजारच्यावर रन्स केलेत. मॅथ्यू हेडनच्या कारकीर्दीविषयी क्रीडा समीक्षक द्वारकानाथ संझगिरी सांगतात, " मॅथ्यू हेडन हा महान फलंदाज होता. त्याच्या कारकीर्दीची सुरुवात फार काही चांगली झाली नाही. पण 2001 साली तो जेव्हा भारतात आला होता तेव्हा त्याच्या करिअरचा आणि प्रगतीचा आलेख जो उंचावला तो आजपर्यंत कायम आहे. एक काळ असा होता की जो शतकांमागून शतकं काढत होता. आम्हाला वाटायचं की मॅथ्यू हेडन रिकी पाँटिंगला मागं टाकून सचिनची बरोबरी करायला पुढे सरसावतोय की काय, इतकी त्याची फलंदाजी बहरली होती. त्याने लाराचा टेस्ट क्रिकेटमधला 375 धावांचा विक्रम मोडला आहे. गेल्यावर्षभरात हेडनचा फॉम घसरला होता. शेवटी यशाच्या शिखरावर कोणी फार काळ राहू शकत नाही."

close