कोल्हापूर महोत्सवातले लक्षवेधी फेटे

January 13, 2009 6:05 AM0 commentsViews: 123

13 जानेवारी, मुंबईशिल्पा गाड मुंबईत शिवाजी पार्क इथं कोल्हापूर महोत्सव सुरू आहे. कोल्हापुरातली प्रत्येक वस्तू या कोल्हापूर महोत्सवात शिवाजीपार्कवर डेरेदाखल झाली आहे. तांबडा रस्सा, पांढरा रस्सा , कोल्हापुरी चप्पला ही जशी कोल्हापूरची ओळख आहे. तशीच ओळख आहे ती कोल्हापुरी फेट्यांची. कोल्हापूर महोत्सवात वेगवेगळ्या रंगाचे, प्रकारांचे, आकारांचे फेटे पहायला मिळाले. कोल्हापुरी फेट्यांची खासियत सांगताना युसुफ अली म्हणाले, " कोल्हापूरमध्ये फेट्यांना विशेष महत्त्व प्राप्त झालं ते शाहू महाराजांमुळे. शाहू महाराजांमुळे कोल्हापूरमधल्या फेट्यांचे महत्त्व वाढत गेलं. त्यांनीच निरनिराळ्या प्रकारचे फेटे बांधण्याची पद्धत रुढ झाली. हे फेटे 20 रुपयांपासून साडेचार हजार रुपयांपर्यंत मिळतात. "

close