26/11 च्या महत्त्वाच्या साक्षीदार बेपत्ता

January 13, 2009 5:36 AM0 commentsViews: 2

13 जानेवारी, मुंबईमुंबई दहशतवादी हल्ल्यातल्या दहशतवाद्यांना पाहणार्‍या अनिता उडीया बेपत्ता झाल्या आहेत. मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यातल्या दहशतवाद्यांना ओळखण्यासाठी त्यांना काही दिवसांपूर्वी हॉस्पिटलला नेण्यात आलं होतं. तेथे त्यांनी सहा दहशतवाद्यांना ओळखलं होतं. पण त्यानंतर अनिता यांची मुलगी, सीमा जोशी यांनी अनिता बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली आहे."अनिता उडीया या रविवारी सकाळी 11 पासून कोणालाही न सांगता घरातून निघून गेल्याची तक्रार त्यांच्या मुलीनं नोंदवली आहे. या प्रकरणी आमचा तपास सुरू आहे. घातपाताची शक्यता देखील पडताळण्यात येत आहे. तपास पूर्ण झाल्यावरच यासंबंधी अधिक बोलता येईल" असं कफ परेडचे पीएसआय सुनील विपट यांनी सांगितलं. दहशतवादी हल्ल्याच्या दिवशी अनिता यांनी दहशतवाद्यांना एअरबोट सोडतांना पाहलं होतं.ज्यावेळी दहशतवादी बधवार पार्कजवळ उतरले त्यावेळी अनिता उडीया यांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला, पण फिल्मची शुटींग चालू आहे असं सांगुन त्यांनी अनिता उडीयांना चकमा दिला. त्यांच्या बेपत्ता होण्याचं गुढ वाढलंय. दहशतवाद्यांना मदत करणारे काही लोक मुंबईत अजुनही आहेत अशीच शंका त्यामुळे येतेय त्यांच्या बेपत्ता होण्यानं मुंबई दहशतवादी हल्ल्याच्या तपासाला चांगलाच झटका बसला आहे.

close