एटीएम मधून पोलिसांचा पगार गायब

June 14, 2013 9:32 AM3 commentsViews: 1597

mumbai police_atMमुंबई 13 जून :> बँकांच्या एटीएम मधून दुसर्‍याच व्यक्तीनं पैसे काढून लंपास केल्याच्या घटना कधीतरी घडतात. मात्र ऍक्सिस बँकेच्या खात्यांमधून चक्क पोलिसांच्या पगाराचीच रक्कम लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. पोलिसांचे पगार ऍक्सिस बँकेत जमा होत असतात. मात्र या महिन्यात बँकेच्या खात्यातून पैसे काढल्याचे आढळून आल्यानं खळबळ उडाली.

अकाउंट हॅक करून पैसे काढण्यात आल्याचं स्पष्ट झालंय. पोलिसांनी बँकेकडे याबाबतचा अहवाल मागितलाय. तसंच याची चौकशी करण्यासाठी एक टीमही तयार केलीय.

एकूण 23 जणांचे अकाऊंट हॅक करण्यात आलेत त्यात 10 ते 12 पोलीस कर्मचारी आहेत. परदेशातल्या एटीएममधून या अकाउंटमधून पैसेही काढण्यात आले. एकूण 13 लाख रुपये काढल्याची माहिती बँकेनं दिली. पोलिसांनी बँकेकडून याबाबत सविस्तर माहिती मागवलीय. शिवाय, डीसीपी अधिकार्‍याच्या नेतृत्त्वाखाली एक पोलीस पथकही स्थापन करण्यात आलंय.

  • tru citizen of aurangabad

    Its to much…..now

  • pratik

    lord save hackers

  • pratik

    lord sav hackers…tru robinhood

close